सरन्यायाधीश यांच्या हल्यावर झालेल्या प्रकरणात पीएम मोठी यांची मोठी प्रतिक्रिया !

Sarnyayadhish Gavai: सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना,भारताचे सरन्यायाधीश यांच्या वर एक वकिलाने चपलीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व घटनेची दखल ही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील घेतली आहे. तर याबाबत त्यांनी आज ट्विट केले आहे. सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरूअसताना त्यांच्या वर हा हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

वकिलांकडून सुनावणी दरम्यान कोर्टात काही कारणा वरुण सुनावणी साठी आलेले वकीय शांततेत न बोलता आपल्या पायातील बूट काडून सरन्यायाधीश्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करताना दिसले. परंतु तेथील पोलिस कर्मचाऱ्यांनी मात्र वेळीच धाव घेत त्या वकिलाला अडवले. त्यानानंतर पोलिसांनी या वकिलाला कोर्टाच्या बाहेर काढले.

भारताचे पंतप्रधान काय बोलले पहा. 

मात्र वकील बाहेर जाण्यापूर्वी “मी सनातनाचा अपमान सहन करणार नाही” असे जोरात बोलत होता. या सर्व घटनेची दखल ही आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील घेतलेली आहे. तर य बाबत त्यांनी आपल्या सोशल मीडिया वर ट्विट करत बोलले आहेत. तर आपल्या ट्विट मध्ये ते बोलतायत की,’भारताचे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्याशी मी बोललो. आज झालेल्या सर्वोच न्यायालयाच्या आवारात झालेल्या हल्याच्या प्रयत्नात सर्व भारतीय नागरिक हे दुखावले गेले आहेत. तर आपल्या समाजात अश्या नीच कृत्यांना स्थान नाही. ही घटना एक निषेधार्त आहे. तर या अश्या परिस्थितील गवई यांनी दाखवलेल्या शांततेला मी सलामी करतो त्यांनी त्यांचे कृत्य न्यायमूर्तीच्या मूल्यांप्रती आणि संविधानच्या प्रती एक बळकट वचनबद्धता दाखाऊन देते.’

तर शरद पवार या विषय काय बोलतायत ते पहा. 

शरद पवार या घटनेवर बोलताना प्रतिक्रिया देतात की, “लोकशाही आणि संविधानाच्या मूल्यांच्या आधारे वाद-प्रतिवादातून न्याय भूमिकेकडे जाण्यासाठी न्यायव्यवस्था ही असते. तर त्याच न्यायव्यवस्थेच्या सर्वोच न्यायव्यवस्थेवर मुख्य न्यायाधीशावर जर अश्या प्रकारे हल्याचा प्रयत्न होत असेल तर,लोकशाहीचा,संविधानाचा आणि आपल्या देशाचा हा एक घोर अपमान आहे. तर आपल्या देश्यात पसरलेल जातीवादेचा विष आता संविधानाच्या सर्वोच संस्थांना देखील जुमानत नाही, तर घटना म्हणजे एक धोक्याची घंटा आहे आहे. मी या घटनेचा जाहीर निषेद करतो” तर कोणत्याही परिस्थितीत भारतीय लोकशाहीचे स्तंभ कमकुवत होणार नाहीत. या साठी आम्ही देखील नेहमी प्रयत्नशील राहू.  या शब्दात त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.

तर पृथ्वीराज चव्हाण हे या घटनेवर काय बोललेत पहा. 

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्याचा प्रयत्न झाल्यानंतर यावर पृथ्वीराज चव्हाण हे बोलतायत की,’आज सर्वोच्च न्यायालयात भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या वर हल्ला झाला. या हल्याचा पहिले मी तीव्र निषद करतो. आप आपल्या मध्ये द्वेष पसरण्यासाठी सांप्रदाई शक्ती ही कीटी टोकाला जाऊ शकते. याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. हा हल्ला म्हणजे संविधानावर केलेला हल्ला आहे. आपल्या भारताच्या मूळ संकल्पनेवर केलेला हल्ला आहे. या घटनेवर सरकारने लवकरात लवकर कारवाई ही केली पाहिजे.

अश्या शब्दात पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आणि सरन्यायाधीश यांना त्यांच्या बद्दल आपल्या भावना सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

हे पण वाचा.  

Chief Justice Bhushan Gavai News/सुप्रीम कोर्टात धक्कादायक प्रकार सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला

Leave a Comment